You are currently viewing मुरुडेश्वर (कर्नाटक) येथे कुडाळ येथील जगन्नाथ संगीत विद्यालयाचा गौरव

मुरुडेश्वर (कर्नाटक) येथे कुडाळ येथील जगन्नाथ संगीत विद्यालयाचा गौरव

प्रशिक्षक महेश सावंत यांचा मुरुडेश्वराची कंठीमाळ घालून केला सन्मान

कुडाळ

कुडाळ येथील जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक महेश सावंत यांचा कर्नाटक – मुर्डेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
कोकणातील लाल मातीत जन्म घेऊन धन्य झालो. खरे श्रेय गुरुवर्य डॉ.दादा परब, भालचंद्र केळुसकर यांना असल्याचे उद्गार महेश सावंत यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना काढले.

श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत(कुडाळ-आंदुर्ले),सहप्रशिक्षक विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर श्री सचिन कातवणकर,युवा गायक श्री अमित उमळकर,तबला वादक कु. साईश उमळकर, ढोलकी वादक कु. ओमकार वेंगुर्लेकर, तनय राणे, श्रीपाद पडोसकर आणि 51 पखवाज वादक विद्यार्थिवर्ग आणि सिद्धाई कला अकादमी संचालिका कु. कविता मोहन राऊळ व कु.जान्हवी ठाकूर, समृद्धी ठाकूर आणि त्यांच्या सहकारी यांनीसहभाग घेऊन शास्त्रीय पखवाज वादन, तबला पखवाज ढोलकी जुगलबंदी आणि भरतनाट्यम आणि 51 पखवाज अनोखा कलाविष्कार श्री क्षेत्र मुरुडेश्वर कर्नाटक येथे जाऊन सादर केला व श्री चरणी सेवा अर्पण केली व सर्व उपस्थितांची मने जिंकली मंदिराचे मॅनेजमेंट चे मेन मॅनेजिंग डायरेक्टर श्री मंजुनाथ शेट्टी यांनी मुरुडेश्वराची कंठीमाळ घालून महेश सावंत यांचा सन्मान केला व प्रत्येक कलाकाराला मानाची शाल पांघरली कार्यक्रम यशस्वीततेसाठी कर्नाटक मुरुडेश्वर येथील श्री कुमार मेस्त्री आणि श्री उमेशजी,श्री सुशांत बांदेकर, शिरोडा यांनी अथक परिश्रम घेतले व सहकार्य केले ध्वनी व्यवस्था ओमकार साऊंड कु. ओमकार वेंगुर्लेकर, पाट यांनी अत्यंत सुंदर केली, कार्यक्रमाचे चित्रीकरण श्री प्रमोद कळंगुटकर, बांदा यांनी केले कार्यक्रम यशस्वीततेसाठी श्री जगन्नाथ विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी विशेष मेहनत घेतली.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =