You are currently viewing मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी – रवी राजा

मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी – रवी राजा

*मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी – रवी राजा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात येत असून सौंदर्यीकरणात पदपथ व रस्त्यांची करण्यात सुधारणा येत आहे. सौंदयकरण होत असताना स्ट्रीट फर्निचरचा समावेश करण्यात येणार आहे. या सगळ्या कामासाठी २६३ कोटी रुपये खर्चणार करण्यात येणार करदात्या मुंबईकरांच्या पैशांची उधळण आहे, असा आरोप मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

मुंबई सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याअंतर्गत रस्त्यांच्या पदपथावर स्ट्रीट फर्निचर बसवण्यात येणार आहे. यावर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही उधळपट्टी असल्याची टीका केली आहे. मुंबईच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली जवळपास १७०० कोटी रुपयांची कामे काढून झाल्यावर आता महापालिका स्ट्रीट फर्निचर बसवण्यावर २६३ कोटी रुपये खर्च करणार आहे. करदात्या मुंबईकरांच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याचे राजा यांनी म्हटले आहे.

स्ट्रीट फर्निचर बसवणे आवश्यक आहे का, याचा विचार न करता टेंडर काढले जात आहे. हे टेंडर काढतानाही ज्या विशिष्ट कंपनीचा फायदा होईल, असे पाहिले जाते आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. महापालिकेचा कारभार प्रशासकाकडून चालवला जात असल्यामुळे वाटेल तशी मनमानी सुरू आहे. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून ही उधळपट्टी तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा