You are currently viewing आठवण…गावाकडील गजाल…!

आठवण…गावाकडील गजाल…!

 श्री ब्राह्मणीस्थळातील प्रवेशद्वार
आणि कलकत्ता येथील कलाकार …!

डेगवे,आंबेखणवाडीच्या “श्री ब्राह्मणी स्थळाचा जिर्णोध्दार” करावयाचा “संकल्प” ग्रामस्थांनी सोडला.व प्रत्येक घरटी “लोकवर्गणी” काढली.शिवाय नोकर वर्गानी व “माहेरवाशीणीनी” आपली यथाशक्ती देणगी देऊन मोलाचे सहकार्य दिले.


डेगवे गावातील हितचिंतकांनी, ग्रामस्थांनी,भक्तानी आपली अमुल्य “देणगी” देऊन या ब्राह्मणी स्थळाच्या कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे.त्यामुळे श्री ब्राह्मणीस्थळ जिर्णोध्दार समितीच्या कार्यकर्त्याना सार्वजनिक कार्य करणाऱ्याना नवी दिशा व प्रेरणा मिळाली आहे.
श्री ब्राह्मणीतीर्थ स्थळातील देवतेच्या कृपेने अंदाजे दोन -तिन लाखांचा बघता,बघता” निधी” संकलीत झाला.हे नमूद करण्यास अत्यानंद होत आहे .त्यामुळे “यु ” आकाराची पत्राशेड,व परीसरातील जिर्णोध्दाराचे काम आपणा सर्वांच्या आर्थिक सहकार्यातून थोडेफार पूर्ण करू शकलो आहे.


श्री ब्राह्मणीस्थळातील “प्रवेशद्वार” बांधण्या करीता संकल्प केला; परंतु खर्चिक बाब होती ;पुरेसा निधी जमा नव्हता.तरीही उमेद सोडली नाही.योगायोगाने दोडामार्ग येथील आमचे मित्र व हितचिंतक मा.बाळा माची काँट्रॅक्टरची अक्षय देसाई यांनी ओळख करुन दिली.दरम्यानच्या काळात ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाली.आमच्या घराच्या परीसरातील कंपाऊंड वाँल बांधायचा होता. त्यामुळे ते काम करण्याकरीता प्राथमिक बोलणी सुरु होती.त्यांच्याकडे सहा जणांची टिम होती.त्यातील एक कलाकार माझ्या नजरेत आला.परंतु छोटी,छोटी काम घेत नाही. असे ते म्हणाले
.मी त्या बाळा माची मालकांशी प्रत्यक्ष बोललो. आमच्या “देवाचे काम” आहे.आपली कला सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण केल्यास कायमस्वरूपी आपले नावं राहील.असे त्यांना सांगितले .हो…?ना ….?करता,करता तो तयार झाला. त्याकरीता एक महिन्याचा अवधी लागेल असे त्यांने सांगितले. आणि खरोखरच तेवढा कालावधी सदर काम पुर्ण करण्या करीता लागला.त्या करीता गंवडी कलाकाराला १ महिना पेट्रोल घालून
अक्षय सदानंद देसाई यांनी आपली बाईक दोडामार्ग डेगवे प्रवासा करीता त्यांना दिली आहे.
.पाऊस तर धो..धो..पडत होता.अशा परीस्थितीत त्यांने “ताडपत्री” वापरून काम केले आहे.ते काम वाखाणण्याजोगी आहे.सदर काम पाहून प्रत्येक भाविक त्यांच्या कामाला,कलेला सर्वजण दाद देत आहेत.ते ऐकून त्याला आनंद वाटत आहे.
“श्री नुर” या गवंडी कलाकारांनी आपली कल्पना प्रत्यक्ष सिमेंट मध्ये साकारली आहे.त्यामुळे त्यांच्या कलेचा “सन्मान” म्हणून श्री ब्राह्मणी स्थळी शाल व श्रीफळ देऊन त्याचा आम्ही “सन्मान” केला आहे.त्यावेळी तो कलाकार मनापासून भारावून गेला . त्यांनी सदर फोटो आपल्या दोडामार्ग येथील मालकाला व कलकत्ता येथील आपल्या नातेवाईकांना फोटो पाठवला.मी अनेक कामे केली परंतु मजूरी व्यतिरिक्त माझा पहिला सन्मान या ब्राह्मणीस्थळी झाला. याचे त्याला राहून राहून कौतुक वाटत होते.
श्री नुर शांत व सयंमी तसेच सर्व कलेत तरबेज असलेला “मोठा कलाकार” असूनही त्यांच्या बोलण्यात मी पणा नाही.किंवा बडेजाव नाही. हे विशेष होय.अशा या कलाकारास समस्थ डेगवे,आंबेखणवाडी ग्रामस्थांच्या वतीने मानाचा मुजरा करीत आहोत.व त्यांच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा व्यक्त करीत आहोत.
मा.बाळा माची यांचेही मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभले आहे.त्यांच्या व्यवसायास आमच्या ग्रामस्थांच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहोत.
🙏💐🙏💐🙏💐🙏💐
—————————————- **✍️उल्हास बाबाजी देसाई*.
––————————————
डेगवे,सावंतवाडी.
—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा