*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जीवनगाणे*
*खळखळधारा नदी धावते*
*गात वाहते जीवनगाणे*
*फांदीवरती एकच पिल्लू*
*बसून आहे उदासवाणे…..*
*पूर्वेला उधळता केशरी*
*रंग सांडला क्षितिजावरती*
*संध्यासमयी नभ काठावर*
*उजळूत आली चंद्रज्योती*…..*
*इतस्ततः विखुरले चांदणे*
*निळसर सावळ आकाशात*
*दिसते छाया लहरत सुंदर*
*कमलफुलांच्या सरोवरात…*.
*हिरव्या रानी गाती गाणी*
*मोरपिसारे आले उमलून*
*वेळूवनातून वा-यासंगे*
*शीळ मजेची येते रंगून…..*
*पिवळ्या पानांची ती टिपटिप*
*निरोप घेते सांगत आहे*
*तांबूस हिरवी मऊ पालवी*
*पुन्हा नव्याने डोलत आहे…।।*
००००००००००००००🍃🌺
*अरुणा दुद्दलवार@✍️*