You are currently viewing स्री

स्री

काव्य आराधना, राष्ट्रीय कवयित्री संमेलन, आम्ही देशपांडे आदी ग्रुप च्या सदस्या ज्येष्ठ कवयित्री सौ अंजली देशपांडे यांची काव्यरचना

देवाने घडवली हि सुंदर कलाकृति,मोहुनी पुरुषांनी लाज टांगली खुंटीला,कोणी अबला समजुनी भोग भोगली,कोणी मानली देवी हिला ……

मंदिरात बसवुनी अष्टभुजा नाव दिले,पण घरच्या देवीला नाही स्थान दिले,पायी तुडव तुडव तुडवली, तिची अब्रु टांगली वेशीला…..

काही आहे सज्जन इथले,सन्मानाचे स्थान दिधले,तिला पुजनिय समजुनी,तिला सबला बनविले,…..

अशाला समाज म्हणती बायला,बाईच ऐकतो बापडा,तेच मान वर करुनी चालती,नाही पाऊल पडत वाकडा,…..

आता तुम्हीच समजा देवी,किंवा भोग विलासी नारी,पण देवाला हि कृती आवडली,म्हणुनच नारीला शक्ती दिली भारी,…..

अंजली देशपांडे
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा