You are currently viewing सिंधुदुर्ग येथील “पत्रकार भवनाचे” २० फेब्रुवारीला उद्घाटन…

सिंधुदुर्ग येथील “पत्रकार भवनाचे” २० फेब्रुवारीला उद्घाटन…

सिंधुदुर्गनगरी

आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नगरीमध्ये होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर भवनाचे उद्घाटन सोमवारी २० फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या नियोजनात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि जेष्ठ पत्रकारांची संयुक्त बैठक सिंधुदुर्ग नगरी येथे पार पडली. या बैठकीमध्ये सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर तसेच पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पत्रकार संघ आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा नियोजन च्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरसकर, राष्ट्रीय माजी अध्यक्ष गजानन नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, खजिनदार संतोष सावंत, सहकार्यवाह महेश रावराणे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सोमवारी २० फेब्रुवारीला नव्याने उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या उर्वरित कामाबाबत चर्चा झाली. हे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत एकमताने ठरवण्यात आले. या भवनासाठी ज्याने जमीन खरेदी करून दिली ते राज्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह ज्यांचे ज्यांचे या भवनाच्या निर्मितीच्या कामासाठी हातभार लागले त्या सर्व लोकप्रतिनिधींचा, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.

दरम्यान भवनांच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यात चा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या विशेष बैठकीमध्ये राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपीला कडक शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाची तीव्र निदर्शने करण्यात आली. या बैठकीमध्ये काळा फिती लावून सर्व पत्रकारांनी दिवंगत पत्रकार वारीसे यांच्या अपघाती मृत्यूचा तीव्र शब्दात निषेध केला. यामध्ये पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरस्कर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, खजिनदार संतोष सावंत, परिषद माजी अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, अभिमन्यू लोंढे, अशोक करंबळेकर, विद्याधर केनवडेकर, महेश सरनाईक, रमेश जोगळे, अमोल टेंबकर, संजय वालावलकर, हरिश्चंद्र पवार, महेश रावराणे, विकास गावकर, प्रभाकर धुरी, बाळ खडपकर, संतोष राऊळ, राजन नाईक, सुहास देसाई, विजय पालकर, रवी गावडे, रामचंद्र कुडाळकर आदी सह पदाधिकारी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा