गोपाळ गवस यांचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर
दोडामार्ग
तिलारी धरण अंतर्गतची अनेक गावे सिंचन क्षेत्राखाली समाविष्ट करण्याची मागणी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे दोडामार्ग तालुका संघटक गोपाळ गवस यांनी केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना श्री. गवस यांनी हे निवेदन दिले आहे.
गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांचा मिळून संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या पाण्यापासून केर, मोर्ले, सोनावल, पाळये, मेढे आदी गावे वंचित राहिले आहेत. या गावांचा सिंचन क्षेत्रामध्ये समावेश केल्यास या गावातील बरेचसे जमीन क्षेत्र ओलिताखाली येईल व त्याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल. ते लक्षात घेता शासन स्तरावरून ही गावे सिंचनाखाली येण्यासाठीची कार्यवाही करण्याची मागणी श्री. गवस यांनी मंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे.