You are currently viewing कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड ‘राज्य तंत्रस्नेहीकार्य गौरव’ पुरस्काराने सन्मानीत…

कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड ‘राज्य तंत्रस्नेहीकार्य गौरव’ पुरस्काराने सन्मानीत…

कणकवली :

शाळा बंद असल्याने सुरु असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे तासनंतास विद्यार्थी मोबाईल समोर बसू लागल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालीवर व क्रयशक्तीवर दुष्परिणाम जाणवू लागले होते. मुले चिडचिडी बनू लागल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडू लागल्याचे निरीक्षणातून पुढे आले. या मानसिकतेतून बाहेर पडता यावे, शारीरिक हालचाली व्हाव्यात व त्यायोगे विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक व भावनिक तंदुरुस्ती टिकावी म्हणून शासन निर्देशानुसार महाराष्ट्र स्तरावर महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलचे माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या शारीरिक शिक्षण विषयक अभ्यासाला महाराष्ट्रभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून शिक्षकांनी तयार केलेल्या खेळ, अभ्यासक्रम, मनोरंजक, प्रेरणादायी व व्यायाम विषयक व्हिडीओतून विद्यार्थ्यांचे मनोरंजन तसेच शारीरिक हालचाली व व्यायाम होऊ लागला. विद्यार्थ्यांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून शिक्षकांद्वारा निर्मित महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 12 तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. या शिक्षकांचा ऑनलाईन पद्धतीने “तंत्रस्नेहीकार्य गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे ता. कणकवली विद्यालयातचे क्रीडा शिक्षक दतात्रय मारकड यांना राज्यस्तरीय लेखन विभागातील पुररकाराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलच्या वतीने ऑनलाईन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा मुंबईचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ पारगावकर यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र तंत्रस्नेही पॅनल प्रमुख राजेंद्र कोतकर (अ.नगर), चंद्रकांत पाटील (पिंपरी चिंचवड), आनंद पवार (धुळे), या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही विभागानुसार संपूर्ण राज्यातून प्रत्येकी दोन पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे-
अभ्यासक्रम विभाग – जाधव बी.डी. (नांदेड), संदीप शिंदे (धुळे); खेळ विभाग – उमेश झोटींग (अ.नगर), डॉ. अविनाश बारगजे (बीड); मनोरंजक खेळ विभाग – हिमांशु तिवारी (पुणे), सचीन अडाणे (लातुर), प्रेरणादायी कथा विभाग – लक्ष्मण चलमले (रायगड), प्रा. सुवर्णा देवळाणकर (पुणे) ; लेखन व बातमी विभाग – जयदीप सोनखास्कर (अकोला), दत्तात्रय मारकड (सिंधुदुर्ग); तंत्रस्नेही मार्गदर्शक पुरस्कार – रोहित आदलिंग (अ. नगर), मोस्ट व्हिवर्स अवॉर्ड – सचिन देशमुख (नागपूर)
या ऑनलाइन कार्यक्रमास राज्यभरातील बहुसंख्य तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. पुरस्कार विजेते दत्तात्रय मारकड यांचे शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, बालभारती अभ्यास मंडळाचे शैलेश नाईक, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. नारकर यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 8 =