You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस साजरा होणार विविध सामाजिक उपक्रमांनी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस साजरा होणार विविध सामाजिक उपक्रमांनी

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजीअध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ३ एप्रिलला विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी ठीक ३.०० वाजता दारिस्ते ग्रामस्थांच्यावतीने *सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील चाणाक्य , युवकांचे प्रेरणास्थान संदेश ऊर्फ गोट्या सावंत वाढदिवस* मोठ्या दिमाखात केक कापून साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी उत्सवमुर्तींना ४८ सौभाग्यवतींच्या हस्ते ४८ दिव्यांनी औक्षण करण्यात येणार आहे. तसेच ४८ शालेयविद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, ४८ जेष्ठ नागरिकांचा सत्कार, ४८ कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात *राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. संजना संदेश सावंत यांचा गावाच्या वतीने सत्कार* करण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संजय सावंत, सरपंच दारिस्ते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =