You are currently viewing सार्वजनिक उपक्रम समितीने चाकण एमआयडीसीतील उद्योग समूहांची केली पाहणी

सार्वजनिक उपक्रम समितीने चाकण एमआयडीसीतील उद्योग समूहांची केली पाहणी

समितीचे अध्यक्ष आ.अशोक पवार,सदस्य आ. वैभव नाईक व इतर सदस्यांची उपस्थिती

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीने आज पुणे जिल्ह्याचा दौरा करत चाकण एमआयडीसीतील बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा , टेट्रा पॅक, ब्रिजस्टोन या कंपन्यांच्या उद्योग समूहांची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार अशोक पवार, समितीचे सदस्य आमदार वैभव नाईक, आमदार सुरेश खाडे, आ. संजय जगताप, आ. माधुरी मिसाळ आदी सदस्य असलेले आमदार, एमआयडीसीचे अधिकारी यांनी उद्योगांची माहिती जाणून घेतली. उद्योगांची उत्पादन क्षमता, औदयोगिक सामग्री, स्पेअर पार्ट, कच्चा माल, तसेच नवनवीन संकल्पना याबाबत एमआयडीसीचे अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा