कणकवली
कनेडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात जात मारहाण,त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांना मारहाण केली.तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत असताना धक्काबुक्की करत अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे २४ जानेवारीला दाखल करण्यात आले होते.या राडा प्रकरणातील तीन गुन्ह्यात दोन्ही पक्षाच्या १० कार्यकर्त्यांना कणकवली पोलिसांनी मध्यरात्री २ वाजता अटकेची कारवाई केली आहे.मध्यरात्री पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतत्वाखालील अटकेची कारवाई करण्यात आली.या आरोपींवर भादवी कलम ३०७,३५३ यासह अन्य गुन्हे असून गंभीर दुखापत करत जीवे मारण्याचा प्रयत्न,सरकारी कामात अडथळा या गुन्ह्यात १३ दिवसानंतर अटक करण्यात आली आहे.
त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंगेश रामचंद्र सावंत (वय ४८,भिरंवडे ), कृणाल विजय सावंत(वय -३४, रा.सांगवे), योगेश रमाकांत वाळके (वय ४२, रा.कनेडी), श्रीकांत नारायण सावंत(वय ५०,भिरंवडे),राजेश मधुकर पवार (वय ५१,दिगवळे) या पाच आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
तर भारतीय जनता पार्टीच्या निखिल प्रकाश आचरेकर(वय ३९, रा. मारुती आळी,कणकवली), अनिल राजाराम पांगम (वय ५८,सांगवे),संतोष वसंत आग्रे ( वय ४९, फोडांघाट) ,संदीप बाळकृष्ण गावकर (वय ३२, सांगवे), तुषार श्यामसुंदर गावकर (वय २९,सांगवे) या पाच जणांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे अधिक तपास करीत आहेत.