You are currently viewing माडखोल-धवडकी शाळेची कार्तिकी वर्दम नागपूर आकाशवाणीवर…

माडखोल-धवडकी शाळेची कार्तिकी वर्दम नागपूर आकाशवाणीवर…

सावंतवाडी

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई यांच्या शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या “फोन इन” कार्यक्रमात आयएसओ मानांकित माडखोल नं.२, धवडकी या शाळेची विद्यार्थीनी कु. कार्तिकी सुनिल वर्दम हिची नागपूर आकाशवाणीवर एपिसोड नं. ४६२ साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे.

या कार्यक्रमात कार्तिकी भारतीय संसद कायदे कसे तयार करते ? या विषयावर बोलणार आहे. हा एपिसोड ३० मे ला सकाळी ११ वा. नागपूर आकाशवाणी वरून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

कार्तिकीच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. भावना गावडे व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. उदय राऊत, केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र वालावलकर सर्व शालेय कमिट्या, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे. आकाशवाणीवर निवड होणारी ही शाळेची सहावी विद्यार्थीनी आहे. शाळेचे उपक्रमशिल शिक्षक श्री. अरविंद सरनोबत यांनी कार्तिकीला मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा