You are currently viewing पिंगुळी येथे जागा बदलून बसते जुगाराची बैठक..

पिंगुळी येथे जागा बदलून बसते जुगाराची बैठक..

सायंकाळी ४.०० वाजता सुरू होते मैफिल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जुगाराला जोर आला असून जिल्ह्यातील खाकीला हाताशी धरूनच जुगाराच्या मैफिली सजवल्या जातात. पिंगुळी येथे दररोज सायंकाळी ४.०० वाजता जागा बदलून जुगाराचे पटबसतात. वटसवित्रीचा नवरा म्हणून ओळखला जाणारा हरमलचा खरे बोलणारा जुगाराची तक्षिम गोळा करून पट मारतो. स्थानिक खाकीला हाताशी धरल्याने खाकिसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र अनभिज्ञ असतात.
संवाद मीडिया गैरधंद्यांच्या विरोधात वारंवार आवाज उठवत असल्याने कुडाळ येथील जागृत नागरिकांनी संवाद मिडीयाशी संपर्क साधून जुगाराची माहिती दिली. बांदा पंचक्रोशीत दशावतारी नाटकांच्या आडून जुगाराचे पट बसविले जात असल्याची बातमी संवाद मीडियाने प्रसिध्द केली होती. संवाद मिडियाच्या बातमी नंतर बांदा पंचक्रोशीतील अवैद्य व्यवसायावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. जिल्ह्यातील तरुणाई बरबाद होणाऱ्या अवैध दारू, मटका, जुगार अशा धंद्यांकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जुगारासारख्या अवैध धंद्यांवर योग्य ती कारवाई करणे तरुण पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा