You are currently viewing पोहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कुडाळच्या शमिका चीपकरचा श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ व सिंधुदुर्ग शिवप्रेमी संघटनेतर्फे सत्कार…

पोहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कुडाळच्या शमिका चीपकरचा श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ व सिंधुदुर्ग शिवप्रेमी संघटनेतर्फे सत्कार…

कुडाळ

कुमारी शमिका सचिन चिपकर या इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने अरबी समुद्रामध्ये ४० किलोमीटर पोहण्याचा जागतिक विक्रम करून आपल्या कुडाळ शहराचे व लक्ष्मीवाडीचे नाव उज्वल केल्याबद्दल श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग तर्फे श्री देवी महालक्ष्मी मंदिरात शमिकाचा सत्कार संपन्न झाला.

सत्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व रोख रक्कम बक्षीस म्हणून दहा हजार रुपये शिवप्रेमी संघटनेकडून देण्यात आले. तसेच महालक्ष्मी मित्र मंडळकडून सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तिला प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आई-वडिलांचा देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळेस उत्सव मूर्ती शमिका चिपकर तिचे आई – वडील, आजी – आजोबा, काका – काकू पूर्ण कुटुंब उपस्थित होते. श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळाचे अध्यक्ष शैलेश काळप, उपाध्यक्ष चंदन कांबळी, लक्ष्मीवाडी प्रभागाच्या नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका सई काळप, माजी नगरसेवक सचिन काळप, शिवप्रेमी संघटनेतील सर्व सदस्य विवेक पंडित, मिलिंद देसाई अशोक सारंग, रमा नाईक, महेश आळवे, लक्ष्मी वाडीतील ग्रामस्थ, लहान मुले उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + eleven =