उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची गरज – आशिष शेलार

उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची गरज – आशिष शेलार

शिवसेनेच्या यंदाच्या दसऱ्या मेळाव्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फ्लॉप चित्रपटा सारखा होता, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून देखील शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता असल्याचं शेलार यांनी सांगितलं आहे.

“शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फ्लॉप चित्रपटासारखा होता. उद्धव ठाकरे त्यांच्या हिंदुत्वाची संघाच्या हिंदुत्वाबरोबर तुलना करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेल्यापासून त्यांचे हिंदुत्व भेसळयुक्त झाले आहे.

होय, उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता आहे.” असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा