You are currently viewing माझ्यातली मी

माझ्यातली मी

*इन्फिनिटी अबॅकस अकॅडमी संचालिका लेखिका कवयित्री आकांक्षा आदित्य देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*माझ्यातली मी*

कुणाची साथ नको,
कुणाची आस नको,
कुणाची प्रीत नको,
कुणाचे बंध नको ||1||

जगण्याला माझ्या
माझीच हाक हवी
मीपणाच्या सामर्थ्याने
आयुष्याला नवी पहाट
हवी||२||

उजेडाणे कवडशाच्या
मनाचा अंधार विझु दे
स्वप्नांना माझ्या धैर्याचे पंख मिळू दे,
माझ्यातल्या मिपणाला खंबिर्ता लाभू दे||३||

दिसले असेल मी
नजरेत कुणाच्या हरताना
पाहते रोज मी
माझीच मला जिंकताना
कारण स्पर्धेत आहे
फक्त माझ्या संगे मी ||४||

आकांक्षा देशमुख
बुटीबोरी, नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + three =