You are currently viewing वेताळ प्रतिष्ठानतर्फे उद्या रेडी- यशवंतगडावर सफाई मोहीम

वेताळ प्रतिष्ठानतर्फे उद्या रेडी- यशवंतगडावर सफाई मोहीम

वेंगुर्ले

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने रविवार ५ फेब्रुवारी रोजी रेडी येथील ऐतिहासिक यशवंतगडवर स्वच्छता

मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यां शिवप्रेमींनी सागर सावंत (९१५८४५४५९५) यांच्याकडे नावनोंदणी करावी. तसेच तुळस येथून सकाळी ७वाजता यशवंतगडाकडे प्रस्थान करण्यात येईल,अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी दिली.यापूर्वीही वेताळ प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा