You are currently viewing कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल

कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल

भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास

*आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ

*मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस,बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कोकणातील 12 रेल्वे स्थानकाचा झाला शुभारंभ

कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण कामाचा व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.रेल्वे स्टेशन आणि त्यांचा परिसर पाहून येणाऱ्या पर्यटक समाधान वाटेल. कोकण चे सौंदर्य मनात भरेल पर्यटन दृष्ट्या कोकणच्या विकासाला आणखीन चालना मिळेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खात्यांतर्गत निधी देऊन कोकणच्या विकासात महायुती सरकार पुढाकार घेऊन काम करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोकणे जनतेच्या विकासासाठी आपले महायुती सरकार कायमच तत्पर राहील असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कोकणातील 12 रेल्वे स्थानक सुशोभीकरण व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामांचे ऑनलाईन भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन पार पडला.कणकवली रेल्वे स्थानकासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार नितेश राणे कणकवली येथे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी केले.
अमृत भारत योजनेच्या धर्तीवर आपल्या कोकण रेल्वेवरील प्रमुख १२ स्टेशनचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसंच अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सा. बां. विभागामार्फत तब्बल १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत,माजी नगाध्यक्ष समीर नलावडे,वैभववाडी भाजप तालुका अध्यक्ष नासिर काझी,भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे राजन चिके,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,महिला नेत्या राजश्री धुमाळे,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अबीद नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा