इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त ओरोस येथे जिल्हा काँग्रेसचा कार्यक्रम….

इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त ओरोस येथे जिल्हा काँग्रेसचा कार्यक्रम….

कणकवली:

पोलादी महिला इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व लोह पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सकाळी ३१ ऑक्टोबरला 10.30 वाजता काँग्रेस जिल्हा कार्यालय ओरोस येथे त्याना अभिवादन करून केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी ओरोस फाटा येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच फ्रंटल विभागाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी सोशलडिस्टंसिंगचे पालन करून उपस्थित राहावे.असे आवाहन महेंद्र सावंत व चंद्रशेखर जोशी सरचिटणीस सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा