You are currently viewing आम. नितेश राणेंच्या उपस्थितीत भिरवंडेतील शिवसैनिकांचा भाजप पक्षात प्रवेश

आम. नितेश राणेंच्या उपस्थितीत भिरवंडेतील शिवसैनिकांचा भाजप पक्षात प्रवेश

कणकवली

तालुक्यातील भिरवंडे मुरडवेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेली विकास कामे आणि विकास कामांसाठी लागणारा निधी या सगळ्याच परीक्षण करून भिरवंडे येथील ग्रामस्थांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना नेते तसेच सिंधुदुर्ग जि. बँकेचे मा. अध्यक्ष सतीश सावंत यांना जोरदार धक्का मानावा लागत आहे. कारण सतीश सावंत, तालुकाध्यक्ष प्रथमेश सावंत यांच्या बालेकिल्ल्यातच हा पक्षप्रवेश झाल्याने राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे.

यावेळी भिरवंडे येथील संदीप ( सॅडू ) सावंत, सुदर्शन सावंत, शुभम सावंत, गौरव सावंत, सुरेंद्र सावंत,जयेश सावंत, तुषार राणे, सुदर्शन वरक, रुपेश सावंत, रोशन चेंदूरकर, संकेत वरक, देवेंद्र दळवी, हार्दिक सावंत, गणेश सावंत, तनिश सावंत, सिद्धेश सावंत, संतोष सावंत, किशोर सावंत (बाबलो), मिलिंद सावंत, अविनाश सावंत, तेजस सावंत, वैभव सावंत, सुनील सावंत, अचित राणे, जयदीप राणे, यांनी आज आम. राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.

ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून जेवढ्या जोरात टीका सुरू आहे त्यापेक्षा जास्त भाजपामध्ये पक्ष प्रवेशांचं इनकमिंग सुरू आहे. आम. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देखील प्रवेशकर्त्यांना दिली.

यावेळी आम. नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश ( गोट्या ) सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, रमेश सावंत, संतोष सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा