दोडामार्ग
पाळये तिठा येथे काल रात्री ८:३० च्या सुमारास गवारेडा दुचाकी च्या समोर अचानक आडवा आल्याने अंजुमन थॉमस नावाच्या केरळयीन युवकाचा अपघात झाला व त्याला गंभिर दुखापत झाली.
काल रात्री अंजुमन नावाचा केरळ मधील मजुर दुचाकी वरून पाळये तिठा येथून जात असताना गवा रेडा अचानक रस्त्यावर दुचाकी च्या समोर आल्याने अपघात झाला. व त्याला गंभिर दुखापत झाली.दरम्यान सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण गवस हे त्या रस्त्यावरून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहत त्या जखमी युवकाला आपल्या चार चाकी वाहनाने साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. टिजो एस यांनी देखील प्रवीण गवस यांना जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी मदत केली. जखमीवर साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यानंतर त्याला अधिक उपचारा साठी १०८ रुग्णवाहिकेने गोवा येथे हलविण्यात आले.
साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिक आहे. मात्र रुग्णवाहिकेवर चालक वेळप्रसंगी मिळत नसल्यामुळे तसेच रुग्णवाहिका चालकाचा फोन नॉट रिचेबल येत असल्यामुळे प्रवीण गवस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.