You are currently viewing कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ मुसळे यांचे निधन…

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ मुसळे यांचे निधन…

कणकवली

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, कणकवली रोटरी क्लबचे पदाधिकारी, कणकवली कंझुमर्स सोसायटीचे संचालक रवींद्रनाथ वसंत मुसळे (कणकवली बाजारपेठ, वय ६९) यांचे आज सोमवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रवींद्रनाथ मुसळे यांच्या प्रकृती अस्वस्थ त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. कणकवली नगर वाचनालयाचे व गोपुरी आश्रमाच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. कणकवलीच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा मोठा योगदान होते. कणकवली शहरातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पुढील वर्षाकरिता त्यांची नुकतीच नियुक्ती देखील करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यातही ते सक्रिय सहभागी असत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा