वैभववाडीत उपसभापती अरविंद रावराणेंची लसिकरण केंद्राना भेट

वैभववाडीत उपसभापती अरविंद रावराणेंची लसिकरण केंद्राना भेट

 

वैभववाडी तालुक्यात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांना पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी भेट देत पाहणी केली. सांगुळवाडी, वैभववाडी व उंबर्डे येथील लसीकरण केंद्रांना त्यांनी भेट दिली. यावेळी सांगुळवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोवीशिल्ड डोस देण्यात आला आहे.

सांगुळवाडी येथील लसीकरण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ गौरी रावराणे, उपसरपंच राहुल जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण, माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बालाजी रावराणे, वंदना गुरव, स्नेहल भोवड, सत्यवान सुतार, पूजा रावराणे, ग्रामसेवक विद्याधर सावंत, तलाठी विजयमाला माळी, आरोग्यसेविका व्ही एस काटकर, आरोग्यसेवक शिवाजी बोडेकर, आशासेवीका साक्षी शेळके, सुप्रिया सुतार, ए.एम.परब, आशिष रावराणे, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा