You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. काल १२/१२/२०२० म्हणजेच आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रेवतीताई राणे यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले होते.  सकाळीच सुरवातीला केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर राणी पार्वती देवी हायस्कूल हॉल येथे सावंतवाडी तालुक्यातील महिला शिक्षिकाचा !!ज्ञानदायिनी गौरव !! सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणारे काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकासभाई सावंत यांनी आदरणीय पवार साहेबांच्या यशस्वी जीवनाचा आढावा घेत त्यांच्या सकारात्मक बाबींचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सुरेश गवस सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उदय भोसले, प्रदेश प्रतिनिधी ,संदिप राणे संचालक शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी, एम डी सावंत, नगरसेविका अफरोज राजगुरू, शुभांगी साटम, रिद्धी परब, तालुका अध्यक्ष रंजना निर्मळ, सौ सडेकर, डॉ मकानदार अशोक पवार व्ही जे एन टी अध्यक्ष, माजी उपसभापती आर के सावंत,मनोहर साटम, प्राचार्य पाटील, उप प्राचार्य सुमेधा नाईक यावेळी सायली लांबर, प्रतीभा बांदेकर, अंकिता देसाई, सतीश नाईक, शरद डीचोलकर, नम्रता सावंत, प्रतीक्षा सावंत, स्नेहल शिवलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =