You are currently viewing बांदा ग्रामपंचायतीवर भाजपाचा एकतर्फी विजय..

बांदा ग्रामपंचायतीवर भाजपाचा एकतर्फी विजय..

सरपंचपदी प्रियांका नाईक विजयी तर अर्चना पांगम यांचा १ हजार १६३ मतांनी पराभव

 

बांदा :

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळविला. भाजपच्या प्रियांका नाईक यांनी शिवसेनेच्या अर्चना पांगम यांचा तब्बल १ हजार १६३ अशा विक्रमी मतांनी पराभव केला.

भाजपने ११ जागांवर विजय मिळवला तर ३ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला. भाजपच्या विजयाने बांदा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा