You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रदान

वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंधरा लाख पारितोषिक वितरण

वेंगुर्ला :

महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन 2017-18 वितरण सोहळा मा. मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सिधुंदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला मानाचा असा तृतीय क्रमांक रोख रूपये 15,00,000/-, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह या स्वरूपात प्राप्त झाला. सदर  सोहळ्याचे वितरण मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांनी या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण केले. या सोहळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीम. साठे मॅडम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजीत नायर, स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, वेंगुर्ल सभापती श्रीम. अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी श्रीम. उमा पाटील, जिल्हा स्वच्छता अधिकारी मनीष पडते, श्री. कीनळेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार कुशेवाडा ग्रामपंचायतीचे सन्मानिय सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामपंचायत कार्यकारीणी, कर्मचारी, उपस्थित ग्रामस्थांनी या पुरस्कारासाठी परीश्रम घेणारे तत्कालीन ग्रामसेवक कै. प्रसाद तुळसकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुरस्कार स्वीकारला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + ten =