You are currently viewing चुकून उतरलेल्या झारखंड येथील व्यक्तीच्या नातेवाईकांचा घेतला शोध

चुकून उतरलेल्या झारखंड येथील व्यक्तीच्या नातेवाईकांचा घेतला शोध

चुकून उतरलेल्या झारखंड येथील व्यक्तीच्या नातेवाईकांचा घेतला शोध

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कामगिरी: नातेवाईकांच्या दिले ताब्यात..

ओरोस

झारखंड येथील इसम सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असता रेल्वे निघून गेल्याने तो बेवारस पणे फिरताना आढळून आल्याने सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात दिले.
16 नोव्हेंबर 2023 रोजी विजय कल्याण हेमरोम रा.कोचेडेगा, पोलीस ठाणे-बसिया इटाम गुमराह राज्य झारखंड हा मुंबई ते गोवा रेल्वेने जात असताना सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असताना रेल्वे पुढे निघून गेली. त्यामुळे सदर ईसम हा तेथच उतरून परिसरात बेवारस रित्या फिरताना रानबाबूळी येथे सागर कवच दरम्यान पोलीस ठाणे अंतर्गत लावण्यात आलेल्या नाकाबंदी अंमलदार ममता चिंदरकर यांना मिळुन आलेला होता. तो व्यवस्थित माहिती देत नसल्याने त्याला पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले होते. तरी पण तो माहिती देत नसल्याने बेवारस म्हणून त्यास सविता आश्रम, पणदुर आश्रमात दाखल करून घेण्यासाठी पत्र देऊन नातेवाईकांचा शोध घेई पर्यंत आश्रमात ठेवण्यात आलेले होते.

या बेवारस इसमाने दिलेल्या किरकोळ व जुजबी माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासावरून त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता तो झारखंड येथील असल्याचे समजून आल्याने तेथील नातेवाईक यांचेशी संपर्क साधून पोलिसांनी ही हकीगत सांगितली. त्यानंतर नातेवाईक यांनी आपण सिंधुदुर्ग येथे येत आहोत व आपल्या भावाला ताब्यात घेत आहोत असे सांगितले. त्या इसमाची बहीण नीलमणी हेमरोम रा.झारखंड व इतर नातेवाईक हे आज रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे आले होते. त्यानंतर सदर इसमास सविता आश्रम येथुन त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी बजावली आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =