रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास कोरोना पॉझिटिव्ह..

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास कोरोना पॉझिटिव्ह..

मुंबई :

 

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दास यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली. या आजाराची कुठलीही लक्षणे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे़ तसेच आयसोलेशन मधून आपण काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, कोणतीही लक्षण नसताना माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी हे सूचित करु इच्छितो. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी रिझर्व्ह बँकेचे कामकाज हे नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. सर्व उपगव्हर्नर आणि इतर अधिका-यांसाठी मी व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन सर्व दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा