You are currently viewing हुमरमळा (वालावल) श्री गणपती मंदिर येथे कच-यासाठी डसबिन

हुमरमळा (वालावल) श्री गणपती मंदिर येथे कच-यासाठी डसबिन

हुमरमळा (वालावल) सरपंच सौ अर्चना बंगे यांनि भाविकांची केली गैरसोय दुर

हुमरमळा (वालावल)

करमळीवाडी येथील गणपती मंदीरामध्ये गणपती उत्सवानिमित्त दोन दिवस दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम दणक्यात होत असतात यामुळे भाविकांची मोठी गर्दी असते यासाठी हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने डसबिन आज उपसरपंच स्नेहल सामंत व माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या हस्ते मंडळाकडे प्रदान करण्यात आला

हुमरमळा आणि वालावल या दोन गावांच्या मध्यभागी असुन ऐतिहासिक कुपिच्या डोंगराच्या कडाकपारीत टुमदार असलेलें हे मंदिर अतिशय देखणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात असुन स्थानिक मंडळाच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने अगदी छानदार कार्यक्रम होत असतात बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी किर्तन, श्री गणेश जन्म, महाप्रसाद,भजने,चार वाजता दशावतार कंपनिचे नाटक असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत,याच मंदीराचा परीसर झळझळुन गेला तो कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या फंडातुन हायमाषट बसविण्यात आला आहे आज झालेल्या या कार्यक्रमाला माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर,मोहन वालावलकर,सौ उज्वला वालावलकर,सुमन वालावलकर, चंद्रकांत पेडणेकर, मंडळांचे अध्यक्ष विजय पेडणेकर,बाळा पेडणेकर, रमाकांत वालावलकर,उदय खडपकर, सचिन पेडणेकर,सौ मनाली पेडणेकर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =