*अध्यात्माच्या प्रांगणात.*
*मागोवा गतकाळाचा..(सिंहावलोकन)*
तो प्रसंग आठवला की,मन ह्रदय अगदी पिळवटून निघतं..कारण आईबाबांच्या लाडक्या मुलीला सासरी पाठवणीचा तो मन हेलावुन टाकणारा तो अत्यंत कटु क्षण असतो,मग त्यामुळे अगदी पाषानह्रदयी आई बाबांच्या डोळ्यात टचकन पाणी येवुन त्यांचं मन लोण्यागत मऊ होवुन जाते. अन् तेव्हा लेकीची ते मागे वळून पाहणं,आईबाबांच्या ह्रदयाचा वेध घेते,अन्,” जा मुली तु दिल्या घरी सुखी रहा”,अशें त्यांच्या मनातुन शुभाशिर्वाद बाहेर पडतात. मग अगदी सहजपणे संत तुकारामाचे ते शब्द आठवु लागता, “कन्या सासुरांशी जाई मागे वळुनिया पाही” हे अगदी खरं आहे असं पटतं..
खरं तर तिचं ते मागे वळून पाहनं,किवा मागोवा घेणं, किंवा गतकाळाचा क्षणैक मागोवा घेणं हे अगदी मनांत दाटुन येत.अन हृया मागोव्यात खुप मोठा गहन अर्थ भरलेला असतो. माहेरच्या गतकाळातील अनेक आठवणीं तिच्या मनात ओसंडून वाहत असतात.अन् समीश्र अशा भा्वभावनांच्या सागराचा बांध फुटतो अन्, अन् त्या सांगरलाटा अश्रुंच्या वाटे डोळ्यातुन बाहेर पडतात..
खरंतर मानवी जिवन हे अनेक प्रकारचे प्रश्न,समस्या,अन् सुखदुःखाचे बनलेले असते अन् ह्या सर्व आठवणी,मनाच्या कोपऱ्यात ठांन मांडुन बसलेल्या, असतात.मनुष्य हा सदैव आठवणींच्या जगात वावरत असतो.अन सुखदुःखाचे भोग भोगंत असतो.. आयूष्याच्या वाटचालीत अनेक प्रसंग, घटना घडत असतं निरागस त्यातुन मानवी जीवन साकारत असतं. मानव हा श्रीमंत असो वा गरीब,किंवा उच्च वा निच कुळातील असो…आयुष्यात विधिलिखिताचे भोग भोगण्यासाठी धरेवर जन्मावं लागतं. खरंतर,हे कर्मफल भोगण्यासाठींच जन्मावं लागतं हे मात्रं एक कटु सत्य आहे..
आयुष्याचे भोग भोगत असताना आपन सदैव पुढेच चालत असतो. जर सुख मिळतं असेल तर आणखी सुख कसे मिळेल ह्यासाठी धडपडत असतो. अन् दुःख मिळतं असेल तरीसुद्धा दुःख दुर होवुन फक्त सुखंच मिळावं ह्या साठींच जिव आटापिटा करीत असतो. पन, गतजन्माचे भोग संपल्या नंतरंच सुख मिळेल हे आपण पुर्णपने विसरुन गेलेलो असतो.. सुखासाठी अगदी आंधळ्यासारखे, सतत पुढेच धावणं असतो..अन् तसतसं अधिकच दुःखी होत असतो..
ह्यांत सर्व धडपडीत आपलं आयुष्य, अन नश्वर शरीर हे क्षिन होत असतं, अन् वेळेचा अपव्यय होतो व शेवटी सुख मिळतं नाही.पन् दुःखाचं भलंमोठं शुन्य राहतं..
ह्यांचं एकमेव कारण म्हणजे, मानव समाज, किंबहुना आपन स्वत: क्षणिक उसंत न घेता, गतकाळाचा, मागोवा न घेता, गतकाळातील चुकांचा किंबहुना आपल्यातील दुर्गुण,अथवा कमतरतांचे सिंहावलोकन करीत नाही.. अन् सतत पुढेंच चालतं राहीलो.. आपण सदैव चुकांच करीत राहिलो.त्यामुळैंच सुखाऐवजी दुःखमय आयुष्य जगत आलो..
खरंतर, कधीं कधीं पशुसुद्धा सारासार विवेकबुद्धी वापरुन, काळाचा अंदाज घेऊन, परिस्थितीनुसार क्षनभर, एक पाऊल मागे घेवुन, परिस्थितीचा मागोवा घेत असतो. अन् ह्यालाच सिंहावलोकन असं म्हटलं जातं.जंगलाचा राजा हिंस्र श्वापद सिंह हा सुद्धा क्षणभर थांबुन परिस्थितीचा अंदाज घेऊन,पुढे झेप घेत असतो त्याचं ते सिंहावलोकन ,अन् त्याची ती झेप यशस्वी होते..
जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर खरोखरच सिंहावलोकन करणं गरजेचं असतं असं मला वाटतं.कारण यशासाठी एक पाऊल मागे घेवुन परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे जाणे हे भावी वाटचालीतील यशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, अन् त्यासाठी आपन गतकाळातील चुकांचा, घटनांचा किंबहुना,अनेक घडामोडींचा मागोवा घेणे हे आगामी सुखदायी आयुष्याची नांदी ठरेल ह्यांत तिळमात्र शंका नाही…
©️ जगन्नाथ खराटे-ठाणे..
३१डिसेंबर..२०२२