You are currently viewing श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाकरीता प्रशासकीय यंत्रणा झाली सज्ज…!

श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाकरीता प्रशासकीय यंत्रणा झाली सज्ज…!

देवगड :

श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाकरीता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यापार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीमध्ये कुणकेश्वर येथे बैठक संपन्न झाली. देवगड तालुक्यातील दक्षिणची काशी असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणाऱ्या महाशिवरात्री यात्रौत्सवा करीता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी १८ जानेवारीच्या बैठकीत संबंधित विभागांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांची पूर्तता होत आली आहे.

देवस्थान ट्रस्ट मार्फतही आवश्यक त्या सोयी सुविधा बरोबर २०० स्वयंसेवक ट्रस्ट मार्फत कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी कुणकेश्वर भक्तनिवास येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना दिली.

यावेळी देवगड तहसीलदार स्वाती देसाई, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, कोषाध्यक्ष अभय पेडणेकर, सरपंच गोविंद घाडी, आण्णा वाळके, अजय नाणेरकर, संजय आचरेकर, अन्य सदस्य व्यवस्थापक रामदास तेजम, उपस्थित होते. या यात्रा नियोजन आढावा बैठकीत सा. बा विभागामार्फत रस्त्यांचे दुरुस्ती अथवा अन्य प्रस्ताव देऊन मंजुरी प्राप्त होऊनही निधीची उपलब्धता होत नाही. स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींची उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीत ग्रामपंचायत नियोजन, पाणी सुविधा दुकान रचना, स्वछता गृह दुकान गाळे, पार्किंग,पाणी शुद्धीकरण,याचा आढावा ग्रामसेवक गुणवंत पाटील यांनी दिला. तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र राठोड यांनी आरोग्य पथक, उपचार केंद्र ,ॲब्युलन्स याबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हा परिषद उपअभियंता महाले यांनी रस्त्यातील खड्डे, रस्त्यांची कामे, झाडी तोडणे कामे पूर्णत्वास प्रसंगी काही भागात सुरू असल्याचे सांगितले. सा. बा. उपविभाग अंतर्गत ही रस्त्यांची कामे व अन्य आवश्यक कामे सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री बासूदकर यांनी दिली. या बैठकीत म.रा.वि.वी. कंपनी उपविभागीय अधिकारी शेख यांनी दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन ट्रान्सफार्मर बसविण्यात येऊन दोन शिफ्ट मध्ये ३० कर्मचारी तैनात केले आहेत. तात्पुरती १०० कनेक्शन देण्यात येणार असल्याचे सांगितले. बीएसएनएल चे उपविभागीय अधिकारी कैलास पायमोडे यांनी ५ कर्मचारी तैनात केले असून मोबाईल सुविधा त्याचबरोबर फायबर लॅडलाईन कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

रापम देवगड आगारामार्फत ३० प्रवासी फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असल्याचे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली मत्स्यव्यवसाय विभागा मार्फत एक गस्तीनौका, पेट्रोलिंग, त्याचबरोबर फायबर पात, सागर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असल्याचे मालवणकर यांनी सांगितले. पोलीस प्रशासन मार्फत नियोजनाची पुरेशी माहिती प्राप्त न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अग्निशमन यंत्रणा, पाणी टँकर, जीवरक्षक यांचा आढावा घेण्यात आला. देवस्थान ट्रस्ट मार्फत दर्शन मंडप, दर्शन रांगा, स्वयंसेवक देवस्वारी व्हीआयपी दर्शन, पास, स्वागत कक्ष, जनरेटर, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस नियंत्रण कक्ष सुविधा याबाबत अध्यक्ष संतोष लब्दे यांनी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा