You are currently viewing वर्धा येथील अभूतपूर्व यशानंतर नंतर परभणीत रंगला मराठी साहित्य मंडळाचा “राज्यस्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा”

वर्धा येथील अभूतपूर्व यशानंतर नंतर परभणीत रंगला मराठी साहित्य मंडळाचा “राज्यस्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा”

श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग व अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय काव्य संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा.

परभणी :

*परभणी येथे रविवार दि. २९ जानेवारी रोजी* श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट (ज्येष्ठ साहित्य, राष्ट्रीय अध्यक्ष, मराठी साहित्य मंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे उद्घाटक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी होते तर स्वागताध्यक्ष डॉ. संगीता आवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर मा. डॉ. डॉ. विजया धुतमल, उपप्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय, मा. सिद्धार्थ कुलकर्णी, नागपूर, कवयित्री लता हेडाऊ, वर्धा मा. गंगाधर भुतारे, औरंगाबाद, डॉ. सुरेश कदम, परभणी, मा. शंकर मानवतकर

कवी संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. घनश्याम पांचाळ, कवयित्री अंजली कांबळे, वर्धा कवी मधुकर भिमरा, ठाणे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कवी व कवयित्रींचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कवी संमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाची उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी यांनी केले ते उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, “नवनवीन माध्यमे आपल्या सोबतीला असताना विद्यार्थ्यांनी, नवोदितांनी नव्या समस्या नवे आव्हाने आपल्या साहित्यामधून मांडली पाहिजेत. आपल्या अभिव्यक्तीला व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम हे कविता आहे. २१ व्या शतकामध्ये इतर सामाजिक माध्यमांचाही उपयोग आपल्या या लेखनाच्या प्रसार व प्रचारासाठी आपणास करता येतो. नवनवीन सॉफ्टवेअर सुद्धा आता नवनिर्मिती करण्यासाठी उपयोगाचे पडत आहेत. भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी नवोदितांनी आग्रही राहिले पाहिजे. नवनिर्मितीचा आनंद आधुनिक माध्यमे देत नसून तो केवळ माणूसच घेऊ शकतो त्यामुळे आपल्या प्रतिभेला प्रयासाने सिद्ध केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्या कवी संमेलनामध्ये ५२ कवींनी सक्रिय सहभाग घेतला. विविध विषयावरील गंभीर तसेच समाज परिवर्तनाला विधायक ठरतील अशा कविता कवींनी सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे यांनी केले.

याप्रसंगी डॉ. सुरेश कदम, डॉ. राजेश गायकवाड, प्रा. राम कटारे, कवयित्री अंजली कांबळे, लत्ता हेडाऊ यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तथा परभणी जिल्हा मराठी साहित्य मंडळाच्या अभ्यक्षा डॉ. संगीता आवचार यांनी मांडले. त्या प्रास्ताविकपर भाषणात त्या म्हणाल्या की, परभणीचे भाषिक वाड्मयीन योगदान मोलाचे राहिलेली आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद परभणीमध्ये भेटतो. आजही आवडीने इथला श्रोता कविता ऐकतो. मराठी साहित्य मंडळाचा पहिलाच कार्यक्रम आम्ही परभणीमध्ये घेत आहोत. नवनिर्वाचित कार्यकारणी नवनवीन असे कार्यक्रम परभणीकरांना देणार आहे. नवनवे वक्ते नवनवीन कवी नवनवे साहित्यिक घडवण्यासाठी मराठी साहित्य मंडळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी या मंडळाचे आजीव सभासद आपण व्हावेत असेही त्या म्हणाल्या.

मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट यांनी अध्यक्षीय समारोपाच्या भाषणामध्ये साहित्यिकांची भूमिका व बांधिलकी यावर विचार मांडले. तसेच कविता हा वाडमय प्रकार अधिक समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक अनुभव वाचन, समाज दर्शन चिंतन, मनन गरजेचे आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी मराठी साहित्य मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व परभणी पंचक्रोशीतील अनेक श्रोते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी साहित्य मंडळ सर्व पदाधिकारी विद्यार्थी शिववाणी वाड्मय स्नेही मंडळ सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले. कविता सादर करणाऱ्या सर्व कवी कवयित्री यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रल्हाद भोपे यांनी केले तर आभार डॉ. संगीता आवचार यांनी मांडले या कार्यक्रमाला मराठी विभागातील डॉ. राजू बडूरे प्रा. अतुल समिंद्रे, प्रा. तेजस्विनी कपाटे, प्रा. सारिका पासंगे, प्रा. डॉ. प्रशांत सराफ, प्रा. अंकुश खटिंग तसेच मराठी साहित्य मंडळाचे प्रा. स्वाती देशमुख, डॉ.राजेश गायकवाड, डॉ. विलास पाटील, प्रा. राम कटारे, सौ अनुराधा वायकोस यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 3 =