You are currently viewing लोककवी पुरस्कारने शाहिर मनोहर पवार यांना सन्मानित

लोककवी पुरस्कारने शाहिर मनोहर पवार यांना सन्मानित

बुलढाणा :

 

संजीवनी संस्थेचा सन्मानाचा लोककवी पुरस्कार केळवद येथिल शाहिर कवी मनोहर पवार यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था संजीवनी बहू शिक्षण प्रसारक संस्था यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील समाजसेवी कलाक्षेत्रातील साहित्यिक कवी लेखक यांना राज्यस्तरीय संजिवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीही सदर पुरस्कार सोहळा व सामुहिक सर्वजातीय लग्न सोहळा पार पडला. त्यामध्ये शाहीर मनोहर पवार केळवद ता चिखली जिः बुलडाणा यांना त्यांच्या काव्यक्षेत्र आणि साहित्याची दखल घेवून सदर संस्थेने निवड करून त्यांना ‘लोककवी’ हा मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यावेळी संस्था अध्यक्ष ‘ डॉ. निवृत्ती जाधव, कवी सुदाम खरे डॉ मंजुराजे जाधव, अग्रसेन रिसार्ट चे मालक सामाजिक कार्यकर्ते व्यवस्थापक अशोक अग्रवाल, डॉ पंढरीनाथ शेळके, नारायणराव वाणी, पंजाबराव टेकाळे सर, वैशाली तायडे, अशोक मोहिते, बार्शी मधुकर हुजरे, धाराशिव सोनकुसरे नागपूर सोनुने अमरावती आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार हा महाराजा अग्रसेन रिसार्ट च्या हॉलमध्ये देण्यात आला यावेळी बहूसंख्येने मान्यवर व साहित्यिक कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते गावोगावीचे समाजसेवी उपस्थित होते. मनोहर पवार यांना यापूर्वीही अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा