You are currently viewing 10 मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन

10 मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने चंदगड व आजरा तालुक्यातील तरुणांसाठी मंगळवार दिनांक 10 रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे.

गोव्यातील नामांकित कंपन्यात चंदगड व आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक व युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले व मुली यांनी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हॉटेल राजवीर प्लाझा, कॉलेज रोड, हिरो शोरूमच्या वर, चंदगड, जि. कोल्हापूर येथे उपस्थित राहावे.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा घेऊन येणे आवश्यक आहे. याठिकाणी कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड करणार आहेत.

अधिक माहितीसाठी कृष्णा सावंत 8263866234, राहुल 8888430143, राजेश 7709151121, निलेश मोरजकर 9763717790 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 12 =