ते अश्रु…

ते अश्रु…

ते अश्रु…

स्वतःच्या सुखात
आनंदाने वाहतात
तर कधी
दुसऱ्याच्या दुःखातही
पापण्या ओल्या करून जातात
ते अश्रु…

मनातली सर्व दुःख
डोळ्यामधे आणतात
कधी डबडबलेल्या डोळ्यांनी
हसायलाही लावतात
तर कधी हलकेच
गालावर ओघळतात
ते अश्रु…

कधी कुणाच्या आठवणीने
डोळ्यातून डोकावतात
तर कधी
कुणाच्या शोधात
डोळ्यातच आटून जातात
ते अश्रु…

आईपासून दूर होताच ते
तान्हूल्याच्या डोळ्यात दिसतात
तर कधी
आईशी बिलगताच तिचा
पदर ओला करून जातात
ते अश्रु…

आपुलकीने कधी
डोळ्यात येऊन राहतात
तर कधी फटकळपणे
डोळ्यांचा निरोपही घेतात.
ते अश्रु….!!!

दीपी…

प्रतिक्रिया व्यक्त करा