You are currently viewing कला

कला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्यरचना*

 

*कला*

दर्शवतात अस्तित्व

स्वतःतील सुंदर कलागुणांनी

घडते परीपूर्ण प्रभावी व्यक्तीमत्व…….!

*कला*

मनाची अभिव्यक्ती

भावभावना संदेश विचार

कलेतून साकार सुयोग्य प्रस्तुती…..!

*कला*

निसर्गदत्त देणं

प्रयत्न आणि परिश्रमाने

संपूर्ण सफलता प्राप्त करणं….!

*कला*

मनाचा विरंगुळा

आवड छंद कलेचा

मन बुध्दीचा आनंद आगळा..!

*कला*

भक्तीभावे साधना

त्यात रममाण एकचित्ताने

घडते जणू ईश आराधना….!

 

**********************

अरुणा दुद्दलवार

दिग्रस यवतमाळ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा