You are currently viewing देवगडची रेणुका पहिली अग्निवीर

देवगडची रेणुका पहिली अग्निवीर

देवगड

देवगड महाविद्यालयाची एम एस्सी भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट जेयुओ रेणुका विलास राणे हीची अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) साठी निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. अभ्यास, एनसीसी आणि क्रीडा क्षेत्रातील तिच्या यशामुळे तिने महाविद्यालयाचे नाव वेळोवेळी विविध स्तरावर उंचावले आहे देवगड महाविद्यालय आणि कॉलेज एनसीसी युनिट ला तिचा अभिमान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा