You are currently viewing सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी कु. नागेश दळवी कोल्हापूर ए. आर. ओ ची अग्निवीर परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी कु. नागेश दळवी कोल्हापूर ए. आर. ओ ची अग्निवीर परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

सावंतवाडी

सावंतवाडी च्या महेंद्रा अकॅडमी चा विद्यार्थी कु. नागेश दळवी याने वयाच्या 20 व्या वर्षी कोल्हापूर ए. आर. ओ ची अग्निवीर भरती मधील ग्राऊंड व लेखी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन घवघवीत असं यश मिळवले आहे…
खरंतर यश मिळविण्यासाठी कष्टाला कधीच शाॅर्टकट नसतो… त्यासाठी प्रामाणिक कष्ट हे घ्यायलाचं हवेत..! आणि नागेश सारख्या होतकरू विद्यार्थ्यांने स्वतः च्या प्रमाणिक कष्टाच्या जोरावर आज यशाला गवसणी घालून मिळविलेले यश कौतुकास्पद आहे…
कठीण परिस्थिती प्रत्येकाची असते. पण; स्वतः च्या परिस्थिती चा गाजावाजा न करता प्रामाणिक मेहनत केली तर यश एकदिवस नक्की मिळतं…आणि नागेश ने त्याच्या यशाने हे सिद्ध देखील केले आहे. म्हणूनचं नागेश च्या भविष्यकालीन वाटचालीस महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी कडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eight =