You are currently viewing सिंधुदुर्गात प्रथमच ‘निरामया आरोग्य विमा योजना व कायदेशीर पालकत्व’ मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्गात प्रथमच ‘निरामया आरोग्य विमा योजना व कायदेशीर पालकत्व’ मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्गात प्रथमच ‘निरामया आरोग्य विमा योजना व कायदेशीर पालकत्व’ मार्गदर्शन शिबिर

४ जुलै रोजी ओरोस येथे आयोजन; बौद्धिक अक्षम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग व ऑटिझम दिव्यांगांच्या पालकांना लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल आणि डीडीआरसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘निरामया आरोग्य विमा योजना व कायदेशीर पालकत्व’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता पत्रकार भवन, ओरोस येथे होणार आहे. बौद्धिक अक्षम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग आणि ऑटिझम असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या पालकांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरणार आहे.
निरामया आरोग्य विमा योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांना औषधोपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध होते. तसेच कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून संबंधित विषयातील तज्ज्ञ उपस्थित राहून पालकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पालकांनी ३० जून २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, यूडीआयडी (स्वावलंबन कार्ड), अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड, फोटो आणि बँक पासबुक यांच्या प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती आणणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग व ऑटिझम दिव्यांगांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे – ९७६५९७९४५०
कार्यालयीन संपर्क – ९६२३६५५१४२
डीडीआरसी – ९३२२०७३९९२.

प्रतिक्रिया व्यक्त करा