You are currently viewing ‘दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम..

‘दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम..

 

माणगाव / मिनानाथ वारंग :

 

शनिवार दि. २४ ऑक्टोबर २०२०  रोजी *’दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग’* च्या वतीने *मनोहर मनसंतोष* या गडावर दिनांक १८ जुलै २०२० रोजी केलेल्या वृक्षारोपणातील झाडांभोवताली गवतावर तणनाशक मारण्यात आले. झाडे मोठी होईपर्यंत झाडांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला दुर्ग मावळा परिवारामार्फत मनोहर मनसंतोष गडावर मोहीम आखली जाते. त्या नियोजनाप्रमाणे आज ही मोहीम आखण्यात आली.या मोहिमेअंतर्गत गडावर लावलेल्या झाडांच्या पडलेल्या जाळ्या नीट करणे, सभोवताल वाढलेल्या गवतावर तणनाशक मारणे इत्यादी कामे करण्यात आली. मोहिमेची सुरुवात गडावरील मूर्त्यांच्या शेजारील गवत काढून करण्यात आली. मागील मोहिमेत कदंब वृक्षाची १० झाडे जगलेली होती. यावेळी त्यातील ९ झाडे जिवंत असलेली आढळून आली. अतिवृष्टीमूळे काही झाडांची पाने गळलेली होती परंतु आता सर्व झाडांना नवीन पालवी आलेली आहे.यावेळी आंबा व कडुलिंबाची २ नवीन झाडे गडावर लावण्यात आली.या मोहिमेसाठी तणनाशकसाठी श्री शाम शिर्के (शिरशिंगे – गोठवेवाडी) तसेच फवारणी पंप श्री शंकर चव्हाण (महादेवाचे केरवडे) यांनी मदत केली. उपस्थितांना अल्पोपहाराची सोय गणेश नाईक यांनी केली.या मोहिमेला गणेश नाईक, प्रसाद सुतार, शांताराम परब, विवेक मांडकूलकर, महेश गावडे, विजय सावंत, वेदिका मांडकूलकर, शंकर नलावडे, रोहन राऊळ, मंदार मेस्त्री इत्यादी मावळे उपस्थित होते.मनोहर मनसंतोष गडावर भ्रमंती साठी जाणाऱ्या दुर्ग प्रेमींना दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागतर्फे हीच विनंती आहे की, जे दुर्ग प्रेमी गडावर जातील त्यांनी त्यांना जमेल तेवढी झाडांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =