You are currently viewing मसुरेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि स्नेहसंमेलन सोहळा

मसुरेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि स्नेहसंमेलन सोहळा

मसुरे :

मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित आर पी बागवे हायस्कूल आणि एमजी बागवे भरतगड उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि स्नेहसंमेलन दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी विद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे. मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी विविध स्पर्धांचे उद्घाटन महेश बागवे आणि श्रीमती सरोज परब यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सकाळी साडेदहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा, साडेबारा वाजता आरती व टोकळ वाडी भजन मंडळ यांचे भजन, दुपारी एक वाजता तीर्थप्रसाद व स्नेहभोजन, सायंकाळी तीन ते पाच वाजता डॉक्टर श्री योगेश विलास महाडिक यांचे एम सी वी सी बाबत व्यवसाय मार्गदर्शन, माजी विद्यार्थ्यांची मनोगते, सायंकाळी सहा वाजता विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ मर्डेवाडी यांचे भजन.

बुधवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते एक वाजता माजी विद्यार्थी विविध स्पर्धा व मनोगते, दुपारी एक ते दोन माजी विद्यार्थ्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी स्नेहभोजन, दुपारी तीन ते पाच माजी विद्यार्थी गीत गायन कार्यक्रम, सायंकाळी सहा ते सात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे गीत गायन कार्यक्रम, सायंकाळी सात ते आठ शालेय विद्यार्थी गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 9 वाजता बक्षिस वितरण समारंभ, रात्र नऊ ते दहा शालेय विद्यार्थी गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी प्रमुख उपस्थिती मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई चे अध्यक्ष तथा उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब आणि विविध मान्यवर तरी या स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेह मिळाल्याचा लाभ घेण्याचे आवाहन आरपी बागवे हायस्कूल मसुरेचे मुख्याध्यापक के ए चव्हाण आणि मसूरे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा