You are currently viewing साटम महाराज पुण्यतिथी निमित्त इन्सुलीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

साटम महाराज पुण्यतिथी निमित्त इन्सुलीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

साटम महाराज पुण्यतिथी निमित्त इन्सुलीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

बांदा

इन्सुली येथील साटम महाराज मठामध्ये २७ मार्चला साटम महाराज पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता लघुरुद्र, श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्री ठीक १० वाजता श्री देव कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर यांचा व्यंकटेश पद्मावती हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाटेकर कुटुंबीय व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =