दोडामार्ग
प्रतिवर्षी प्रमाणे साळ येथील श्री श्री देव घवनाळेश्वराचा संकपृकषण विधी कार्यक्रम २७ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. सदरचे देवस्थान साळ येथील प्रतिथयश उद्योजक व समाजसेवक मेघश्याम राऊत व कुटुंबीय यांच्या अधिपत्याखाली येत असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मेघश्याम राऊत यांनी केले आहे.
या निमित्त संकपृकषण विधी, स्थल शुद्धीकरण, लघुरुद्र, जप, हवन, ब्रम्ह होम, सत्यनारायण महापूजा, तीर्थ व महाप्रसाद, आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता महादेव मंदिराकडून देव श्री देव घवनाळेश्वर मंदिरापर्यंत पायी दिंडी निघेल व रात्रौ ९ वाजता नाईक मोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.