You are currently viewing विनामास्क फिरणार्‍यांवर बांद्यात दंडात्मक कारवाई…

विनामास्क फिरणार्‍यांवर बांद्यात दंडात्मक कारवाई…

बांदा

बांदा शहरात विना मास्क फिरणार्‍यांवर आज ग्रामपंचायत प्रशासन व पोलीसांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली. अचानकपणे सुरु केलेल्या कारवाईमुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली. आतापर्यंत सुमारे २० हून नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव राज्यात वेगाने होत असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत. त्यानुसार बांदा आठवडा बाजारादिवशी कारवाईला सुरूवात करण्यात आली. नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 17 =