महाविकास आघाडीचे सरकार धार्मिक स्थळं उघडण्याच्या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) आखेल…

महाविकास आघाडीचे सरकार धार्मिक स्थळं उघडण्याच्या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) आखेल…

– पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई

विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळ उघडण्यासाठी आज एका मोर्चाचं आयोजन केलय.. माझा त्यांना एकच प्रश्न आहे की, आजच्या घडीला धर्मस्थळ उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का..? केंद्र सरकारने येवढ्या दिवसांमध्ये सर्व राज्यांसाठी धार्मिक स्थळ उघडण्याच्या बाबतीत आदर्श कार्यप्रणाली का नाही आखून दिली. धार्मिक स्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं.. सीमेवर चीनच्या चाललेल्या आक्रमक हालचाली, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन राहायचं आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत याच प्रात्यक्षिक मिळतं.

महाविकास आघाडीचे सरकार लवकरच धार्मिक स्थळं उघडण्याच्या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) आखेल..तद्नंतरच महाराष्ट्रातली धार्मिक स्थळं उघडण्यात येतील असे मंत्री वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री मुंबई शहर अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा