You are currently viewing भावलेलं कोकणी व्यक्तिमत्व

भावलेलं कोकणी व्यक्तिमत्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगनेकर लिखित अप्रतिम लेख*

*पद्मश्री मधु मंगेश कर्णिक*

*भावलेलं कोकणी व्यक्तिमत्व*

निसर्ग सौंदर्याने समृद्ध वैभवशाली असलेला आपला हा कोकण, कोकणी माणसाचा स्वाभिमान आहे अभिमान आहे.
प्रसिद्ध साहित्यकार वि स खांडेकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यांच्यासारखे श्रेष्ठ साहित्यकार म्हणजे कोकणाची अमूल्य आभूषणे आहेत. त्यांचे साहित्य वाचताना आपले ऊर अभिमानाने भरून येते.
शब्दांच्या या वाटेवरती
चला अक्षर अक्षर चालू
वाक्यांच्या अर्थामधले
धडधडते अंतर खोलू
अर्थाच्या मागे दडल्या
त्या सुखदुःखांना बोलू
कवितांच्या गोष्टी
आणिक गोष्टींच्या
कविता बोलू
शब्दांच्या वाटेवरती
चला अक्षर अक्षर चालू

श्रेष्ठ साहित्यकार मधु मंगेश कर्णिक साहित्य प्रेमाने आणि साहित्य प्रतिभेने भरलेले सदाबहार ‘मधुघट”, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कर्णिकानी सातत्यपूर्ण लेखन करून स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले . त्यांच्या समृद्ध आणि वांग्मयीन व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य,कविता ,नाटक, आत्मचरित्र या वांग्मयीन प्रकारातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
मधु मंगेश कर्णिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करूळ गावचे त्यांचे मूळ नाव आरस. कर्णिक ही त्यांच्या पूर्वजांना इंग्रजांनी दिलेली सनद, त्यावरून त्यांचे नाव कर्णिक पडले. कर्णिक यांच्या साहित्य निर्मितीचा आरंभ शालेय जीवनापासून झाला. मालवणच्या पारूजी नारायण मिशाळ यांच्या बाल सन्मित्र पाक्षिकात त्यांची पहिली कविता छापून आली. त्यापासून प्रेरणा घेऊन मधुमंगेश कर्णिक लिहू लागले.
त्यांच्या लेखणीचा झपाटा विलक्षण होता. मालवणी मुलखातील कोकणी माणसाला कर्णिकानी शब्दरूप दिले. तसेच करून गावाबद्दल त्यांना अपार प्रेम आहे त्या प्रेमाला त्यांनी
“करुळचा मुलगा “आत्मचरित्रामध्ये शब्दबद्ध केले.
मधु मंगेश कर्णिक यांचा पिंड जसा साहित्यिकाचा आहे तसाच तो सामाजिक सांस्कृतिक कार्यकर्त्याचाही आहे. कोकणी माणूस आणि कोकणी मुलुख हा त्यांच्या निष्ठेचा विषय आहे. आणि याच निष्ठेतून कोकण मराठी साहित्य परिषद, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, करून पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, केशवसुत स्मारक, कोकणकला अकादमी अशा कितीतरी चांगल्या गोष्टी निर्माण केल्या.
केंद्रशासनच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, रणजीत देसाई पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1958 साली मालवण येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला.
“जिवाभावाचा गोवा” मधील ललित म्हणजे एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराने जिवंत रंगाने रेखाटलेली निसर्ग चित्रे आहेत. या पुस्तकाला अनंत काणेकर पुरस्कार लाभला. सोबत अभिर गुलाल, माझा गाव, माझा मुलुख, नारळ पाणी, हे त्यांचे ललित लेख आहेत.
“शब्दांनो “हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. विलोभनीय निसर्ग चित्रे, उत्कट शृंगार रंग, तरल प्रीतीचे मुग्ध लावण्य, गावाकडील माणसांची सुखदुःखे, मानवी जीवनातील श्रेयस आणि प्रेयस यांचा चिंतनपर शोध अशा विविध स्तरावर हा कवितासंग्रह लक्षणीय ठरला.
ते वास्तवतावादी कादंबरीकार
बरोबर वेधक ललित लेखन केले आहे.” भाकरी आणि फुल” या कादंबरीत पंचवीस वर्षातील एका अस्पृश्य कुटुंबाच्या स्थित्यंतराचा आलेख समृद्धपणे रेखाटला आहे. सृजनशीलतेचा मर्मबंध आहे.
पण केवळ या प्रादेशिक चित्रण करणाऱ्या पुरती त्यांची प्रतिभा सीमित राहिली नाही. सामाजिक स्थित्यंतराच्या सूक्ष्म अवलोकनामुळे आणि वाढत्या अनुभव विश्वामुळे त्यांचे लेखन क्षितिज विस्तीर्ण होत गेलेले आढळते.
संवेदनशील मनाचे आणि सर्जनशील प्रतिभेचे दर्शन मधु मंगेश कर्णिकांच्या एकूण साहित्यातून घडते.
कोकणच्या मातीत साहित्यांच्या निर्मितीचे मूलबीज आहे. येथील माणसांच्या सहवासात प्रतिभेला नित्य नवे धुमारे फुटतात.
लाल मातीत अंकुरले

सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा