You are currently viewing कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर यांनी प्रजासत्ताक दिनी वेगळा आदर्श..

कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर यांनी प्रजासत्ताक दिनी वेगळा आदर्श..

ध्वजारोहणाचा मान दिला गावातील अपंग व्यक्ती शुभम दीपक कवठणकर यांना..

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर यांनी प्रजासत्ताक दिनी वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे, ग्रामपंचायत येथील ध्वजारोहणाचा मान त्यांनी गावातील अपंग व्यक्ती शुभम दीपक कवठणकर यांना देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आहे, त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे इतर गावातील सरपंचांनी अनुकरण करावे असे बोलले जात आहे.

आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आपला झेंडा ध्वजारोहणाचा मान बाजूला ठेवत सरपंच अजित कवठणकर यांनी आपल्या गावातील अपंग व्यक्ती शुभम दीपक कवठणकर यांना व्हीलचेर वरून ध्वजारोहण स्थळी आणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले व एक चांगला पायंडा गावात घालून दिला.

अजित कवठणकर हे कवठणी गावचे मागील पाच वर्ष उपसरपंच होते, आता सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत त्यांनी एकतर्फी विजय संपादन केला होता, एक युवा आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.गावच्या विकास कामात त्यांचे मोठे योगदान आहे,कोरोना काळात त्यांनी गावासाठी भरीव कामगिरी केली होती, म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

याप्रसंगी सोनम सोमनाथ कवठणकर,रश्मी राजेंद्र कवठणकर,अजय दशरथ सावंत,अमीत देवानंद कवठणकर, रामेश्वर रघुनाथ कवठणकर,विजया विजय कवठणकर,श्रध्दा शामसुंदर कवठणकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 9 =