*अरण्येश्वर शिक्षण संस्थेत आरोग्य भारतीतर्फे पालकांना आरोग्य कीटचे वाटप ,व मार्गदर्शन*
पुणे
दि.२४/०१/२०२३ रोजी अरण्येश्वर शिक्षण संस्थेच्या हाॅॅलमधे ‘आरोग्य भारती’तर्फे इ.१ ली ते ५ वी च्या पालकांसाठी आरोग्य जागर कार्यक्रम घेतला .त्यात आरोग्य भारतीचे उपाध्यक्ष प्रा.डाॅ. सुरेश पाटणकर,डाॅ.पालीवाल,दाभोळकर,जोशी,गटणे व सर्व कार्यकर्ते हजर होते.
अरण्येश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब ढुमे,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डाॅ.सौ.भावना जोशी,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता गायकवाड, इ.पाचवीचे शिक्षक सौ.सावंत बाई,व सौ.सोनवणे बाई ,पालक बंधू भगिनी,विद्यार्थी सर्वांनी या आरोग्य जागराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे निवेदन सौ.मनिषा इरकल बाईंनी बहारदार केले.
इ.चौथीच्या मुली व सौ.वसुधा नाईक यांनी स्वागत गीत म्हटले.
डाॅ.नी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.
आरोग्य कीटचे वाटप केले.प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिलेल्या कीटचा वापर समजून सांगितला.
मा.मुख्याध्यापकांनी पालकांशी हितगूज केली.
डाॅ.सुरेश पाटणकरांनी आरोग्याचे महत्व पटवून दिले.
आरोग्यकीटचे वाटप झाले.
सरते शेवटी सौ.राजश्री ढोबळे बाईंनी गोड शब्दात आभार मानले.
सौ.वसुधा नाईक,पुणे