You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित टेक फेस्ट चे उद्घाटन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित टेक फेस्ट चे उद्घाटन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित टेक फेस्ट या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळीेचे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल आय क्यु एसी समन्वयक डॉ. बी एन हिरामणी , आयटी समन्वयक डॉ.उमेश पवार ,संगणकशास्त्र विभागाचे समन्वयक प्रा.योगेश पवार , माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापिका सौ. ए वाय गोडकर, संगणक शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापिका सौ व्ही व्ही गवंडे ,तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रा.प्रणाम कांबळे , प्रा.आदित्य वर्दम, सिद्धिविनायक सावंत, प्रा.एस एस नाईक ,प्रा.सुरज सावंत,प्रा. तन्वी शिंदे, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल यांनी केले व उपस्थितांचे स्वागत केले.टेक फेस्ट या कार्यक्रमा संबंधी माहिती संगणक शास्त्र विभागाच्या सौ विभा गवंडे यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये कुणाल गावडे व रुद्र परब यांनी विद्यार्थ्यांच्यावतीने समन्वयक म्हणून काम केले.
संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान हे उभारते तंत्रज्ञान आहे.देशाच्या प्रगतीमध्ये संगणक शास्त्राने फार मोठा हातभार लावलेला आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना टेक फेस्ट साठी शुभेच्छाा दिल्या.
प्राध्यापक सुरज सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =