You are currently viewing कणकवली रिंग रोडचं काम सुपरफास्ट

कणकवली रिंग रोडचं काम सुपरफास्ट

दुसऱ्या टप्प्यातील मोजणी पूर्ण

कणकवली

कणकवली गांगो मंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर आणि चौंडेश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर नागवे रोड या दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोडची मोजणी मंगळवारी करण्यात आली यावेळी सर्व बाधित जमीन व घर मालक उपस्थित होते सकाळी दहा वाजता सुरू करण्यात आलेल्या मोजणी सायंकाळी उशिरा समाप्त झाली.

वाटाघाटीने होणाऱ्या भूसंपादना करिता संयुक्त जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बांधकाम, कृषि, भूमि अभिलेख आणि वनविभाग, नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ चित्रीकरण करत ही मोजणी प्रक्रिया झाली. यादरम्यान बाधित घराची अंतर्गत मापे पुढील काही दिवसात नगरपंचायत कडून घेण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.

त्या नंतर मोजणीचे संयुक्‍त पत्रक निश्‍चित होईल. त्‍यानंतर रिंग रोड च्या 12 मीटर रुंदी च्या अंतरात येणाऱ्या जमीन मालकांना प्रक्रियेअंती मोबदला देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. कणकवली शहर विकास आराखड्यात शहरातील सर्व वाड्यांशी जोडणारा रिंगरोड प्रस्तावित आहे. यातील आचरा रोड लक्ष्मी चित्रमंदिर ते राष्‍ट्रीय महामार्गालगतचे गांगो मंदिर या दरम्‍यानचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. तर गांगो मंदिर ते नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर या दुसऱ्या टप्प्याचे काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक मंगेश नानचे, बाळकृष्ण कदम, वनविभागाचे एम.एल. गुडेकर, नगरपंचायतचे सतीश कांबळे, मनोज धुमाळे, सचिन नेरकर, अनंत कुबल, विभव करंदीकर, दशरथ मांडवे, बाधित घर मालक व जमीन मालक आदी उपस्थित होते.

या बाधित जमीन मालक व घर मालक यांनी आम्ही नगरपंचायती ला रस्ता करण्यासाठी नेहमी सहकार्य करत आहोत तरी आम्हाला लवकरात लवकर योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी नगरपंचायतीने पाठपुरावा करावा अशी अपेक्षा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडे व्यक्त केली

प्रतिक्रिया व्यक्त करा